\n

अमेरिका गुणतालिकेत अव्वल स्थानी…

\n

2024 च्या टी-20 विश्वचषकातील पाकिस्तानचा हा पहिलाच सामना होता आणि त्यातच त्यांना त्यांच्यापेक्षा खूपच कमकुवत असलेल्या अमेरिकेविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. या विजयासह अमेरिकेचा संघ अ गटात दोन विजय आणि चार गुणांसह अव्वल स्थानी पोहोचला आहे. त्याचबरोबर भारत एका सामन्यानंतर दोन गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तानचा पुढील सामना 9 जून रोजी भारताविरुद्ध आहे. त्याचबरोबर अमेरिकेचा संघ आता 12 जूनला भारताशी भिडणार आहे.

\n

T20 World Cup 2024 : भारत-पाक सामन्याचं तिकिट Online कसं बुक करायचं? येथे जाणून घ्या, Step-by-Step संपूर्ण माहिती…

\n

\n

अन् सामना सुपर ओव्हरमध्ये पोहोचला….

\n

160 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना यूएसएची सुरुवात चांगली झाली कारण कर्णधार मोनांक पटेल आणि स्टीव्हन टेलर यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. अमेरिकेला 36 वर पहिला धक्का बसला. नसीम शाहने स्टिव्हन टेलरला रिजवान करवी झेलबाद केले. त्याला 12 धावा करता आल्या. त्यानंतर अमेरिकेला 104 धावांवर दुसरा धक्का बसला. हॅरिस रौफने अँड्रेस गॉसला क्लीन बोल्ड केले. त्याला 26 चेंडूंत पाच चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 35 धावा करता आल्या. गौसने कर्णधार मोनांक पटेलसोबत 68 धावांची भागीदारी केली. अमेरिकेला 14.1 षटकात 111 धावसंख्येवर तिसरा व मोठा धक्का बसला. कर्णधार मोनांक पटेल 38 चेंडूंत सात चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 50 धावा करून बाद झाला. आमिरने त्याला रिझवानकरवी झेलबाद केले.

\n

त्यानंतर एकेकाळी अमेरिकन संघ धावांचा पाठलाग करताना पुढे होता आणि संघ सहज जिंकेल असे वाटत होते. 16 षटकांत अमेरिकेने 3 गडी गमावून 126 धावा केल्या होत्या आणि 24 चेंडूत 34 धावा हव्या होत्या. इथून पाकिस्तानी गोलंदाजांनी सामना फिरवला. पुढच्या तीन षटकात 19 धावाच दिल्या आणि आता 20 व्या षटकात म्हणजेच 6 चेंडूत अमेरिकेला विजयासाठी 15 धावांची गरज होती.

\n

T20 World Cup 2024 : ड्रॉप इन पिच (खेळपट्टी) म्हणजे काय? भारत-पाक सामन्यापूर्वी यावरून का होतोय गदारोळ…

\n

\n

हारिस रौफ गोलंदाजी करत होता. आरोन जोन्स आणि नितीश कुमार स्ट्राइकवर होते. नितीशने पहिल्या चेंडूवर एक धाव घेतली. त्यानंतर जोन्सनेही दुसऱ्या चेंडूवर 1 धाव घेतली. तिसऱ्या चेंडूवरही एक धाव आली. ॲरॉन जोन्सने चौथ्या चेंडूवर षटकार ठोकून अमेरिकेला सामन्यात परत आणले. यानंतर जोन्सने पाचव्या चेंडूवर एक धाव घेतली. अशाप्रकारे अमेरिकेला विजयासाठी शेवटच्या चेंडूवर पाच धावांची गरज होती. नितीश आता स्ट्राईकवर होता. त्याने शेवटच्या चेंडूवर चौकार मारून सामना बरोबरीत आणला. यादरम्यान आरोन जोन्सने 26 चेंडूत 5 चौकार अन् 1 षटकारासह 35 धावांची नाबाद खेळी केली तर नितेश कुमारनेही 14 चेंडूत एका चौकारासह नाबाद 14 धावा करत महत्वपूर्ण खेळी केली.

\n

तत्पूर्वी, प्रथम खेळताना पाकिस्तानने निर्धारित 20 षटकांत 7 बाद 159 धावा केल्या होत्या. पाकिस्तान संघाचा कर्णधार बाबर आझमने 44 तर शादाब खानने 40 धावांची खेळी केली. आझम खान पुन्हा फ्लॉप झाला आणि गोल्डन डकचा बळी ठरला. त्याचवेळी इफ्तिखार अहमद 14 चेंडूत 18 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. शाहीन आफिद्रीने 16 चेंडूत एक चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 23 धावांची नाबाद खेळी खेळली. दरम्यान, अमेरिकेकडून गोलंदाजीत नॉशतुश केन्झिगेने 3 विकेट घेत प्रभावित केले. तर सौरभ नेत्रावळकरने दोन गडी बाद केले. अली खान आणि जसदीप सिंग यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

\n","keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat, Breaking News, Maharashtra News","name":"T20 World Cup 2024 : विश्वचषकस्पर्धेत पहिला मोठा उलटफेर..! Super Over मध्ये अमेरिकेविरूध्द पाकचा ‘असा’ झाला लाजीरवाणा पराभव…","thumbnailUrl":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/06/pak-1.jpg","locationCreated":{"@type":"Place","name":"Maharashtra","alternateName":"महाराष्ट्र"},"author":{"@type":"Person","name":"प्रभात वृत्तसेवा","url":"https://www.dainikprabhat.com/author/swapnilhajareeprabhat-net/"},"publisher":{"@type":"NewsMediaOrganization","@id":"https://www.dainikprabhat.com/#Organization","name":"Dainik Prabhat","legalName":"Dainik Prabhat","description":"Dainik Prabhat is a leading Marathi news website providing latest news updates from Maharashtra, India and around the world","foundingDate":"1999-01-01","slogan":"Latest Marathi News Updates","url":"https://www.dainikprabhat.com/","image":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","sameAs":["https://www.facebook.com/dainikprabhat","https://twitter.com/dainikprabhat","https://www.youtube.com/channel/dainikprabhat","https://www.instagram.com/dainikprabhat/"],"areaServed":"IN","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100},"address":{"@type":"PostalAddress","streetAddress":"Dainik Prabhat Office","addressLocality":"Pune","addressRegion":"Maharashtra","postalCode":"411001","addressCountry":{"@type":"Country","name":"IN"}},"contactPoint":{"@type":"ContactPoint","contactType":"customer support","url":"https://www.dainikprabhat.com/contact-us/"}},"speakable":{"@type":"SpeakableSpecification","xpath":["/html/head/title","/html/head/meta[@name='description']/@content"]},"image":[{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/usa-vs-pak-live-score-first-big-upset-of-t20-world-cup-2024-america-beats-pakistan-in-super-over#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/06/pak-1.jpg","width":1200,"height":675}],"isPartOf":{"@type":"WebPage","@id":"https://www.dainikprabhat.com/usa-vs-pak-live-score-first-big-upset-of-t20-world-cup-2024-america-beats-pakistan-in-super-over#webpage","name":"T20 World Cup 2024 : विश्वचषकस्पर्धेत पहिला मोठा उलटफेर..! Super Over मध्ये अमेरिकेविरूध्द पाकचा ‘असा’ झाला लाजीरवाणा पराभव…","url":"https://www.dainikprabhat.com/usa-vs-pak-live-score-first-big-upset-of-t20-world-cup-2024-america-beats-pakistan-in-super-over","inLanguage":"mr","description":{"rendered":"","protected":false},"keywords":"Latest News, Marathi News, Dainik Prabhat","publisher":{"@type":"Organization","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","logo":{"@type":"ImageObject","url":"https://www.dainikprabhat.com/images/logo-prabhat.png","caption":"Dainik Prabhat","width":300,"height":100}},"isPartOf":{"@type":"WebSite","@id":"https://www.dainikprabhat.com/#website","name":"Dainik Prabhat","url":"https://www.dainikprabhat.com/","inLanguage":"mr"},"primaryImageOfPage":{"@type":"ImageObject","@id":"https://www.dainikprabhat.com/usa-vs-pak-live-score-first-big-upset-of-t20-world-cup-2024-america-beats-pakistan-in-super-over#primaryimage","url":"https://axdxht1orlhu.compat.objectstorage.ap-hyderabad-1.oraclecloud.com/media.dainikprabhat.com/wp-content/uploads/2024/06/pak-1.jpg","width":1200,"height":675},"breadcrumb":{"@type":"BreadcrumbList","@id":"https://www.dainikprabhat.com/usa-vs-pak-live-score-first-big-upset-of-t20-world-cup-2024-america-beats-pakistan-in-super-over#breadcrumb","itemListElement":[{"@type":"ListItem","position":1,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/","name":"Dainik Prabhat"}},{"@type":"ListItem","position":2,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/category/latest-news","name":"Latest News"}},{"@type":"ListItem","position":3,"item":{"@type":"Thing","@id":"https://www.dainikprabhat.com/usa-vs-pak-live-score-first-big-upset-of-t20-world-cup-2024-america-beats-pakistan-in-super-over","name":"T20 World Cup 2024 : विश्वचषकस्पर्धेत पहिला मोठा उलटफेर..! Super Over मध्ये अमेरिकेविरूध्द पाकचा ‘असा’ झाला लाजीरवाणा पराभव…"}}]}}}

T20 World Cup 2024 : विश्वचषकस्पर्धेत पहिला मोठा उलटफेर..! Super Over मध्ये अमेरिकेविरूध्द पाकचा ‘असा’ झाला लाजीरवाणा पराभव…