वडूज – खटाव तालुक्यात गांजाचा मोठा सापडल्याच्या घटनेनंतर आता वाकळवाडी, (ता. खटाव) येथील शेतात लावलेली तब्बल 75 किलो अफू वडूज पोलिसांनी छापा टाकून जप्त केला आहे. याबाबत वडूज पोलीस स्टेशनमध्ये अफूची शेती केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, वाकळवाडी येथील शिवारात एक गुंठा क्षेत्रात अफूची लागवड केली असल्याची माहिती वडूज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांना मिळाली होती. माहितीच्या आधारे त्यांनी कर्मचाऱ्यांसह छापा टाकला. या छाप्या दरम्यान वाकळवाडी शिवारात शांताराम रामचंद्र म्होप्रेकर, चंद्रप्रभा शिवाजी म्होप्रेकर, विमल पंढरीनाथ म्होप्रेकर (रा. वाकळवाडी) यांनी त्यांच्या मालकीच्या शेतात त्यांच्या शेताच्या मधोमध गहू, हरभरा, कांदा पिकाच्या आडोशाला महाराष्ट्र राज्यात बंदी असलेले मानवी शरीरास अपायकारक असणारे गुंगीकारक अफूची लागवड केलेली आढळून आली.
पीक लागवडीनंतर सुमारे दोन ते अडीच फूट उंचीचे ओलसर हिरवीगार पाने, त्यांना पांढरे फुले व हिरवे गोलाकार बोंडे असलेली पान फुलांचे तयार झालेल्या
75 किलो वजनाचा 1 लाख 52 हजार 700 रुपये किंमतीची अफू जप्त करण्यात आली. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर, पोलीस उपअधीक्षक निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स. पो. नि. मालोजीराव देशमुख, पोलिस उपनिरीक्षक शीतल पालेकर, दादा देवकुळे, संदीप शेडगे, दर्याबा नरळे, दीपक देवकर, भूषण माने, शिवाजी खाडे, सागर बदडे, मेघा जगताप, वृषाली काटकर यांनी सहभाग घेतला. स. पो. नि. मालोजीराव देशमुख अधिक तपास करत आहेत.