सातारा -जिल्ह्यातील विविध रुग्णालये आणि करोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 69 जणांना दहा दिवसांनतर मंगळवारी घरी सोडण्यात आले. तर 432 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.
घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये कराड तालुक्यातील शारदा क्लिनिकमधील 17 वर्षीय युवती, 17 वर्षीय युवक, 58, 37 वर्षीय महिला, 24, 20 वर्षीय पुरुष, खोडशी येथील 1 वर्षीय बालक, 26 वर्षीय महिला, कासारशिरंबे येथील 14 वर्षीय बालिका, कवठे येथील 26 वर्षीय पुरुष, कालवडे येथील 58, 50 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठेतील 40 वर्षीय पुरुष, कार्वे येथील 6 वर्षीय बालक,
शामगाव येथील 34 वर्षीय पुरुष, आटके येथील 90, 59 वर्षीय पुरुष 82, 64, 26 वर्षीय महिला, मलकापूर येथील 53 वर्षीय महिला, सह्याद्री हॉस्पिटलमधील 51 वर्षीय पुरुष., पाटण तालुक्यातील नेरले येथील 55 वर्षीय महिला, अंब्रग येथील 55, 34, 23 वर्षीय महिला, 13 वर्षीय बालिका, 8 वर्षीय बालक, 55 वर्षीय पुरुष, म्हावशी येथील 42, 24, 54 वर्षीय पुरुष, 58 वर्षीय महिला, निगडे येथील 35 वर्षीय महिला,
अडूळ येथील 37 वर्षीय पुरुष., वाई तालुक्यातील पसरणी येथील 45 वर्षीय पुरुष, 18, 16 वर्षीय युवक, 42, 49 वर्षीय महिला, रेनावळे येथील 28 वर्षीय पुरुष., सातारा तालुक्यातील कण्हेर येथील 62 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय महिला, रामकुंड येथील 35 वर्षीय पुरुष, तामजाईनगर येथील 44 वर्षीय महिला, शनिवार पेठेतील 67 वर्षीय पुरुष, 55 वर्षीय महिला,
काशिळ येथील 23, 37 वर्षीय पुरुष, 36, 60 वर्षीय महिला, 19 वर्षीय युवक, लक्ष्मी टेकडी येथील 1 पुरुष व 4 महिला, 50 वर्षीय महिला, जिहे येथील 38, 45 वर्षीय पुरुष, पोगरवाडी येथील 42 वर्षीय पुरुष, शनिवार पेठेतील 24 वर्षीय पुरुष, केसरकर पेठेतील 37 वर्षीय महिला, गुरुवार पेठेतील 33 वर्षीय पुरुष., शेळकेवाडी येथील 9 वर्षीय बालक, 26 वर्षीय पुरुष., जावळी तालुक्यातील रायगाव येथील 43 वर्षीय पुरुष,
34 वर्षीय महिला., फलटणच्या रविवार पेठेतील 27 वर्षीय महिला यांचा समावेश आहे. जिल्हा रुग्णालयातील 28, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयातील 111, फलटण उपजिल्हा रुग्णालयातील 15, कोरेगाव 4, वाई 34, खंडाळा 77, पानमळेवाडी 23, मायणी 32, महाबळेश्वर 5 व कृष्णा हॉस्पिटलमधील 103 अशा एकूण 432 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने तपासणीला पाठविले आहेत.