राजगुरूनगर- खेड तालुक्यात करोनाचा संसर्ग वाढतच आहे. मागील 24 तासांत नव्याने 57 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. तालुक्यात आतापर्यंत करोना पॉझिटिव्हंची संख्या 3254 झाली आहे. तर मृत्यूची संख्या 76 वर गेली आहे. तर 633 जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
राजगुरूनगर येथे 63 वर्षीय तर भोसे गावातील 65 वर्षीय व्यतीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मागील 24 तासांत राजगुरूनगर (4), चाकण (16), आळंदी (3) या तीन नगरपरिषदांमिळून 23 तर तालुक्यातील ग्रामीण भागातील चिंबळी (2), कान्हेवाडी चाकण (1), खालुंब्रे (1), खराबवाडी (6), कुरुळी (1), म्हाळुंगे (4), नाणेकरवाडी (5), निघोजे (1), येलवडी (2), काळूस (3), रासे (1), शेलगाव (2) पिंपळगाव तर्फे चाकण (3), टाकळकरवाडी (2) या 14 गावांत 34 असे एकूण 57 पॉझिटिव्ह आढळले आहेत.