जुबा (दक्षिण सुदान) – सुदान आणि दक्षिण सुदान दरम्यानच्या तेल समृद्ध अबेयी मधील गावावर काही सशस्त्र हल्लेखोरांनी केलेल्या हल्ल्यामध्ये किमान ५२ जण ठार झाले आहेत. मृतांमध्ये संयुक्त राष्ट्राच्या शांतिसैनिकांचाही समावेश आहे.
याशिवाय या हल्ल्यामध्ये ६४ जण जखमी देखील झाले आहेत, असे स्थानिक अधिकार्यांनी म्हटले आहे. शनिवारी संध्याकाळी झालेल्या या हल्ल्यामागील नेमका उद्देश स्पष्ट होऊ शकला नाही. मात्र हा हल्ला जमिनीच्या वादातून झाला असल्याचा संशय आहे.
अबेयीमध्ये वांशिक संघर्ष नेहमीच घडत असतो. अबेयी भागाच्या शेजारील वॅरप प्रांतातील ट्विक डिंका आदिवासींचे अबेयीमधील गोक डिंका आदिवासींशी अनीत भूभागावरील हक्काच्या मुद्यावरून वाद सुरू असतात.
शनिवारच्या हिंसाचारातील हल्लेखोर नुएर जमातीतील सशस्त्र तरुण होते जे त्यांच्या भागात पुरामुळे गेल्या वर्षी वॉरप राज्यात स्थलांतरित झाले होते,