भारत-रशिया मैत्री अधिक दृढमूल होईल
मुंबई, दि. 15 – भारत व रशिया यांच्यातील मैत्री व सहकार्य अधिक दृढमूल होईल, असा विश्वास पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी व्यक्त केला. रशियातील “ऑक्टोबर क्रांती’चा 60वा वाढदिवस साजरा केला जात आहे.
त्यासाठी पाठविलेल्या संदेशात देसाईंनी हा विश्वास प्रकट केला आहे. याच महिन्यात देसाई हे रशियाला भेट देणार आहेत. 23 ते 30 ऑक्टोबरपर्यंत हा क्रांतीचा वाढदिवस साजरा केला जाईल.
काळाच्या गरजेनुसार वृद्धाश्रमांची गरज
पुणे – घरातील वृद्ध मातापित्यांची अखेरपर्यंत सेवा करण्यात धन्यता मानण्याची परंपरा आता राहिलेली नाही. म्हणून बदलत्या काळानुसार वृद्धाश्रमांची गरज आहे, असे मुख्यमंत्री वसंतदादा पाटील म्हणाले.
मनपा कर्मचाऱ्यांनाही महागाईभत्ता वाढ
पुणे – महाराष्ट्र राज्य सरकारी नोकरांना राज्य शासन वेळोवळी ज्या दराने महागाईभत्त्यात वाढ देईल त्याच दराने मनपातील सेवकांना वाढ देण्यात येईल.