मुंबई/पुणे : अमेरिकेतून आलेल्या कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या एका 68 वर्षीय महिलेला कोरोनाची बाधा झाली आहे, असे मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तर पिंपरीतील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली. त्यामुळे राज्यातील बाधीतांची संख्या 44वर पोहोचली आहे.
ही महिला अमेरिकेतून आलेल्या व्यक्तीच्या निकटच्या संपर्कात आली होती. ही व्यक्ती कोरोनाबाधीत असल्याचे दोन दिवसांपुर्वी आढळून आले होते. या व्यक्तीपासून त्याची पत्नी आणि तीन वर्षीय कन्या यांनाही बाधा झाली होती. या नव्या बाधितामुळे कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या आठवर पोहोचली आहे. महापालिकेच्या रुग्णालयात 82 संशयितांना दाखल करण्यात आले असून त्यांच्या चाचण न्निकाल अद्याप आले नाहीत.
सर्व बाधितांवर चिंचपोकळी येथील कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत, असे सुत्रांनी सांगितले.
पुण्यातील व्यक्ती थायलंडमध्ये जाऊन झाली होती. त्याच्यावर यशवंतराच चव्हाण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुण्यात एका महिलेला सकाळी दाखल करण्यात आले. ही महिला नेदरलॅंडहून आली होती. ती संपर्कात आलेल्या व्यक्तींची चाचणी घेण्यात येत आहे.