टाकळी हाजी : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या पोलिस उपनिरीक्षक परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यामधे टाकळी हाजी येथील वर्षा जनार्धन साबळे हिने राज्यात मुलीमध्ये तृतीय क्रमांक मिळवला आहे.
राज्य लोकसेवा आयोगाने सन २o१८ मधे फौजदार पदाची मुख्य परीक्षा झाली होती. वर्षा साबळे हिने सन २०१३ पासुन राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी केली होती.
मुख्य परीक्षेमधे २४७ तर शारीरीक चाचणी मधे १०० पैकी १०० गुण मिळवित फौजदार होण्यांचे तिचे स्वप्न साकार झाले आहे. वर्षा हिचे शिक्षण टाकळी हाजी येथील जिल्हा परीषद व बापुसाहेब गावडे विद्यालयात झाले आहे.
मागील तीन वर्षात टाकळी हाजी गावातील विद्या गंगाराम पवार, किशोरी हरिदास साबळे, संगिता दगडु पोकळे यांची पोलिस निरीक्षक पदी निवड झाली आहे. वर्षा साबळे यांच्या रूपाने गावची चौथी महीला फौजदार झाली आहे.
या बदद्ल फौजदार वर्षा साबळे म्हणाल्या की, अधिकारी होण्याचे स्वप्न माझे होते . माझ्या कुटुंबांनी मला शिक्षणासाठी प्रेरणा दिली. मुलींना अधिकारी होणे अवघड नसुन मनात ध्येय व कष्ठ करण्यांची तयारी ठेऊन लक्ष विचलित न होता अभ्यास करावा. ध्येय नक्कीच साध्य होईल, अशा भावना तीने व्यक्त केल्या. मंत्री दिलीपराव वळसे पाटील, माजी आमदार पोपटराव गावडे, जिल्हा परीषद सदस्य सुनिता गावडे, पंचायत समिती सदस्या गावडे यांनी तिचे अभिनंदन केले आहे.