इंदापूर, (प्रतिनिधी) – आमदार दत्तात्रय भरणे यांच्या प्रयत्नातून शासनाच्या अल्पसंख्याक विभागातंर्गत इंदापूरसाठी सुमारे 3 कोटी निधी मंजूर झाला आहे. गेल्याच आठवड्यात आमदार दत्तात्रय भरणे यांनी अल्पसंख्याक समाजासाठी निधी मंजूर करण्याचे सुतोवाच केले होते. लागलीच हा शब्द खरा ठरवत आमदार भरणे यांनी इंदापूर शहरासह ग्रामीण भागातील मुस्लिम वस्त्यांना भरघोस निधी दिला आहे.
त्यामुळे मुस्लिम बांधवांकडून आमदार दत्तात्रय भरणे यांच्या कामाचे कौतुक होत आहे. आमदार भरणे म्हणाले, आमदार म्हणून काम करताना सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन प्रत्येक घटकाला उचित न्याय देण्यासाठी मी इमाने-इतबारे मेहनत घेतली असून तालुक्यातील प्रत्येक गाव, वाडी-वस्तीपर्यंत विकासगंगा पोहचवली आहेच;
परंतु या सोबतच खास करून दलित तसेच मुस्लिम वस्त्यांनाही भरभरून निधी देण्याचा प्रयत्न मी निश्चितपणे केला आहे; मात्र आपण एवढ्यावर समाधानी नसून येणार्या काळात अजून यापेक्षा जास्त निधी मंजूर करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
मंजूर झालेली विकासकामे व कंसात निधी न्हावी येथे कब्रस्तान कंपाऊंड व पेव्हर ब्लॉक, बिजवडी पठाण मज्जिद, पठाण वस्ती येथे सभामंडप, कालठण कब्रस्तान येथे अंतर्गत रस्ता व वॉलकंपाऊंड , सणसर येथे दफनभूमी संरक्षण भिंत, अंथुर्णे येथे मशिदी समोर सभामंडप, बोरी येथे दफनभूमी इदगाह मैदान, जंक्शन येथे इदगाह मैदान, बोरी येथे शादीखाना हॉल,
लाकडी येथे मशीद समोर सभामंडप, शेळगाव शेख वस्ती येथे मशिद समोर सभामंडप बांधणे, निमगाव केतकी येथे इदगाह मैदान करणे, भिगवण येथे दफनभूमी संरक्षण भिंत बांधणे, जाचक वस्ती, शेखवस्ती येथे मज्जिद समोर सभामंडप, भांडगाव येथे दफनभूमी संरक्षण भिंत, निमसाखर, शेख वस्ती येथे मज्जिद समोर सभामंडप, डाळज नं 2 येथे मज्जिद समोर सभामंडप,
शिरसटवाडी, पठाण वस्ती येथे मज्जिद समोर सभामंडप, सणसर येथे इदगाह मैदान, कळंब, पठाण वस्ती येथे मज्जिद समोर सभामंडप, पोंदकुलवाडी येथे शादीखाना सुशोभिकरण, काटी येथे सुशोभिकरण, कळंब येथे कब्रस्तान वाल कंपाऊंड, निंबोडी येथे सुशोभिकरण (सर्व कामांना प्रत्येकी 10 लाख).
इंदापूर शहरातील मंजूर झालेली विकासकामे
मदिन मज्जिद येथे पेव्हर ब्लॉक व काँक्रिटीकरण करणे, शेख मोहल्ला मज्जिद येथे सुशोभीकरण करणे, श्रीराम कॉलनी जवळील दफनभूमीमध्ये ईदगाह मैदान तयार करणे, दर्गा मज्जिद समोर सुशोभिकरण करणे, दर्गा मज्जिद शेजारी दफनभूमी वॉल कंपाऊंड बांधणे, जामा मज्जिद येथे वॉल कंपाउंड व शेड बांधणे, मदिना मज्जिद समोर सुशोभिकरण करणे (सर्व कामांना प्रत्येकी 10 लाख).