पाथर्डी – शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील राज्यमार्ग व प्रमुख जिल्हामार्गांची 27 कोटी 50 लाख किमतीची कामे पुरवणी अर्थसंकल्पामध्ये समाविष्ट करण्यात आल्याची माहिती आ. मोनिका राजळे यांनी दिली.
या पुरवणी अर्थसंकल्पात पाथर्डी तालुक्यातील प्रजिमा 39 ते तोंडोळी सोनोशी येळी रस्ता करणे (रक्कम 3 कोटी), तिसगाव ते अमरापूर रस्ता करणे (6 कोटी), राममा 61 ते अकोला जांभळी खरवंडी रस्ता करणे (6 कोटी) या कामांचा समावेश आहे.
शेवगाव तालुक्यातील मुंगी ते कोळी वस्ती रस्ता व पूल करणे (2 कोटी), शेवगाव-पैठण रस्ता करणे (1 कोटी 50 लाख), तिसगाव- शेवगाव- पैठणमधील रस्त्याची दुरुस्ती करणे (2 कोटी 50 लाख), मिरी माका ते शेवगाव रस्त्याची दुरुस्ती करणे (2 कोटी), खानापूर रावतळे राक्षी रस्त्याची दुरुस्ती करणे (2 कोटी), नेवासा- शेवगाव- गेवराई रस्त्याची दुरुस्ती करणे (2 कोटी 50 लाख) या रस्त्यांच्या कामांचा समावेश असल्याचे आ. राजळे यांनी सांगितले. मतदारसंघातील बहुतेक प्रमुख रस्त्यांची कामे पूर्ण झाली असून, काही रस्त्यांची कामे प्रगतिपथावर आहेत.