सासवड -पुरंदर तालुक्यातील गुऱ्होळी येथील पॉझिटिव्ह व्यक्तीच्या घरातील अजून तीन व्यक्ती करोना पॉझिटिव्ह असल्याचा अहवाल आज प्राप्त झाला आहे.
यामुळे गुऱ्होळी येथील करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आतापर्यंत सहा झाली असून त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनोबत यांनी दिली. आजच्या अहवालामुळे गुऱ्होळीसह संपूर्ण तालुक्यात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.