राजगुरूनगर : खेड तालुक्यात करोनाचा फास आणखी आवळला जात असून पॉझिटिव्ह व्यक्तींची संख्या वाढतच आहे. आज दिवसभरात तब्बल २२ व्यक्ती पॉझिटिव्ह सापडल्याने तालुका हादरला आहे तालुक्यात करोनाबाधित रुग्णाची संख्या २१५ वर पोहचली आहे. आज एका खाजगी मोठ्या बँकेत काम करणाऱ्या १० कर्मचाऱ्यांचा स्वब तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने राजगुरूनगर शहरात खळबळ उडाली आहे.
खेड तालुक्यात करोना विषाणू संसर्ग झपाट्याने वाढत आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात खेड तालुक्यात सर्वाधिक करोना बाधित व्यक्ती सापडत असल्याने चिंतेची बाब बनली आहे. तालुक्यात लॉकडाऊन सुरु केले आहे. मात्र ते दिवसभर करणे आता भाग पडणार आहे. राजगुरूनगर शहरातील संख्या झपाट्याने वाढली आहे खबरदारीच्या उपाययोजना कडक आणि काटेकोरपणे राबविण्यात याव्यात. प्रशासनाने कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत.
खेड तालुक्यात आज संध्याकाळी ८ वाजेपर्यंत तब्बल २२ व्यक्तीचा करोना स्वब अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तालुक्यातील बाधित व्यक्तीची संख्या २१५ झाली असल्याची माहिती प्रांताधिकारी संजय तेली, पस सभापती अंकुश राक्षे यांनी दिली. तालुक्यात आज (दि. ६) रोजी राजगुरूनगर सात व्यक्ती, आळंदी ४ व्यक्ती, चिंबळी, मोई प्रत्येकी दोन व्यक्ती तर आखरवाडी, कडधे, चांडोली,रासे, सोळू, काळूस, चिंचोशी प्रत्येकी एक अशा २२ व्यक्ती पॉझिटिव्ह सापडल्या आहेत. यामध्ये राजगुरूनगर येथील एका बँकेच्या १० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.\
खेड तालुक्याची करोना विषाणू संसर्ग आकडेवारी पुढील प्रमाणे :
आतापर्यंत बाधित व्यक्ती संख्या = २१५
करोनामुक्त झालेली व्यक्ती संख्या = ५३
उपचार घेत असलेल्या व्यक्ती संख्या = १५७
तालुक्यातील एकूण मृत्यू संख्या = ५
आजची बाधित व्यक्तींची संख्या = २२
आज अखेर अहवाल येणे बाकी = ५१