कोपर्डे हवेली – पार्ले (ता. कराड) येथील परगाणा शिवारातील सुमारे वीस ते बावीस एकर क्षेत्रातील ऊस आज दुपारी दीडच्या सुमारास जळून खाक झाला असून आगीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. आगीने रौद्ररूप धारण केले असताना शेतकऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे ऊसाचे क्षेत्र काही प्रमाणात वाचवण्यात यश आले. आगीचे कारण मात्र समजू शकले नाही.
ऊस जळालेल्या शेतकऱ्यांमध्ये मिलिंद दिलीप नलवडे, भिकाजी लक्ष्मण पाटील, अजित दादासो पाटील, राजेंद्र हरी नलवडे, जे. के. पाटील, अधिकराव नलवडे, भाऊसो एकनाथ चव्हाण आदींसह इतर शेतकऱ्यांचा सामावेश आहे.
या शिवारात ऊसाचे क्षेत्र मोठे आहे. भरदुपारी ऊसाला आग लागल्याचे समजताच अनेक शेतकऱ्यांनी परगाणा शिवाराच्या दिशेने धाव घेतली आणि ऊस तत्परतेने तोडून आग विझवण्यात आल्याने पुढील ऊस आगीपासून वाचवण्यात शेतकऱ्यांना यश आले. ऊस जळीताचे कारण स्पष्ट झाले नाही. जळालेल्या ऊसाच्या क्षेत्रात पार्ले आणि कोपर्डे हवेलीतील शेतकऱ्याचा समावेश आहे.