पिंपरी – सांगवी फाटा येथील जिल्हा रुग्णालयात शुक्रवारी (दि. 28) 21 करोनाबाधित रुग्ण नव्याने आढळले. तर, दहा करोनामुक्त रुग्णांना घरी सोडण्यात आले.
करोनाबाधित रुग्ण हे पिंपळे निलख, पिंपळे गुरव, जगताप डेअरी, हिंजवडी, पिंपळे निलख, सांगवी, दापोडी, रहाटणी, शिक्रापुर (ता. शिरुर), खुटगाव (ता. दौंड), पांगारे (ता. पुरंदर), पिरंगुट (ता. मुळशी), औंध, माणगाव, धायरी फाटा, धायरी आदी भागातील आहेत. त्यामध्ये 14 पुरुष आणि 7 महिला रुग्णांचा समावेश आहे.
करोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये राजगुरुनगर, औंध, केंदुरगाव (ता. शिरूर), पिंपळे गुरव, घोडकेवाडी (ता. मुळशी), सासवड, बोर्डेनगर येथील रहिवाशी आहेत. त्यामध्ये 8 पुरुष आणि 2 महिलांचा समावेश आहे.
रुग्णालयात आज 2 करोना संशयित रुग्णांना उपचारासाठी दाखल केले. सध्या 45 जणांवर उपचार सुरू आहेत. त्यातील 31 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. करोनामुक्त झालेल्या 252 रुग्णांना आतापर्यंत घरी सोडण्यात आले. एकूण 91 रुग्णांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे.