१० वर्षांत दिल्लीच्या सरकारी शाळांमध्ये मोठे बदल
केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारच्या अंतर्गत सरकारी शाळांमध्ये लक्षणीय बदल झाल्याचे मंत्र्यांनी अधोरेखित केले.
त्या म्हणाल्या की, गेल्या १० वर्षांत दिल्लीच्या सरकारी शाळांमध्ये मोठे बदल करण्यात आले आहेत. आम्ही राष्ट्रीय राजधानीतील शिक्षणासाठीचे बजेट दुप्पट केले आहे. आज आम्ही दिल्लीतील शिक्षणासाठी १६३९६ कोटी रुपयांचे बजेट प्रस्तावित करत आहोत. या आधी दिल्लीच्या सरकारी शाळांची स्थिती चांगली नव्हती. लोकांना शिक्षणासाठी खाजगी शाळांमध्ये जावे लागत हेाते असे आतिशी, यांनी नमूद केले.
माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी दिल्लीतील शैक्षणिक परिस्थिती सुधारण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली अशी माहितीही त्यांनी दिली. दिल्ली सरकार शिक्षकांच्या प्रशिक्षणावर काम करत आहे आणि आतापर्यंत ४७९१४ शिक्षकांना नियमित केले आहे तर ७००० रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे.
विद्यार्थ्यांचे निकाल सुधारले –
केजरीवाल सरकारच्या काळात दिल्लीच्या सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांचे निकाल सुधारले आहेत आणि ते आता खासगी शाळांपेक्षा चांगले प्रदर्शन करत असल्याचे त्या म्हणाल्या. सरकारी विद्यापीठांमधील जागा वीस हजारांनी वाढवण्यात आल्या आहेत ज्यात एकूण ९३ हजार विद्यार्थी सध्या या नोंदणीकृत आहेत. हा अर्थसंकल्प ७६,000 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आणि सरकार ‘राम राज्य’चे स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले.
दिल्लीतील महिलांना मिळणार दरमहा एक हजार रूपये –
दिल्ली सरकारने आपल्या राज्यातील सर्व महिलांना दरमहा एक हजार रूपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे. आजच्या अर्थसंकल्पात ही घोषणा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री महिला सन्मान योजना नावाने ही मदत येाजना लागू केली जाणार आहे. “2024-25 च्या अर्थसंकल्पात महिला कल्याणासाठी २७१४ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प प्रस्तावित करण्यात आला आहे.
महिलांच्या कल्याण आणि सक्षमीकरणासाठी ‘मुख्यमंत्री महिला सन्मान योजने’अंतर्गत २००० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. अनुसुचित जाती, जमाती आणि ओबीसी कल्याण विभागाच्या अंतर्गत विविध योजनांसाठी ६२१६ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.
२०१४ मध्ये दिल्लीचा जीएसडीपी ४.९५ लाख कोटी रुपये होता आणि गेल्या दहा वर्षांत दिल्लीचा जीएसडीपी अडीच पटीने वाढून तो आता ११.०८ लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. २०१४ मध्ये दिल्लीचे दरडोई उत्पन्न होते. 2.47 लाख रुपये आणि आज दिल्लीचे दरडोई उत्पन्न 4.62 लाखांवर पोहोचले आहे जे राष्ट्रीय सरासरीपेक्षा अडीच पट जास्त आहे.