पिरंगुट- वाळेण (ता. मुळशी) येथील सरूबाई शंकरराव साठे या 110 वर्षांच्या आजींनी आज (दि. 21) विधानसभा निवडणुकीत आपला मतदानाचा हक्क बजावला. विविध निवडणुकांत त्यांनी आजपर्यंत 50 वेळा मतदान केले असून, त्यांच्या या उत्साहाचे परिसरात कौतुक होत आहे. सरूबाई साठे यांचे चिरंजीव मोहनराव साठे हे वाळेणचे माजी सरपंच होते.