तिसऱ्या कसोटीत भारत विजयाच्या उंबरठ्यावर

रांची : दक्षिण अफ्रिकेविरूध्दच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारत विजयाच्या उंबठ्यावर पोहोचला आहे. फॉलोऑन दिल्यानंतरही अफ्रिकेचा दुसरा डावही कोसळला. तिसऱ्या दिवशी खेळ थांबला त्यावेळी अफ्रिकेची अवस्था आठ बाद 132 अशी झाली होती. डावाचा पराभव टाळण्यासाठी त्यांना अजून 235 धावांचा डोंगर पार करायचा आहे.

थ्यूनिस दी ब्रुयान आणि ऍनरिच नोर्तजे खेळत आहेत. दुसऱ्या डावाची सुरवातही अडखळत झाल्यानंतर जॉर्ज लिंडे आणि डेन पीएडट यांनी तळ ठोकून डाव सावरण्याचा प्रयत्न केला. या दोघांची भागीदारी आकार घेईल, असे वाटत असतानाच शहबाझ नदीमच्या अचुक फेकीवर लिंडे ( 27 धावा) धावचित झाला. त्यापाठोपाठ डेनचा त्रिफळा उडवत रविंद्र जडेजाने अफ्रिकेच्या आशांवर पाणी फेरले.

डेन 23 धावांवर तंबूत परतला. त्यापुर्वी भारतीय गोलंदाजीचा संयमाने प्रतिकार करणारा डीन एल्गर 16 धावांवर असताना डोक्‍याला चेंडू लागल्याने जखमी होऊन या पुर्वी रिटायर झाला आहे.

भारताच्या वतीने महंमद शामीने अवघ्या 10 धवांच्या बदल्यात अफ्रिकेचे तीन मोहरे गारद केले. उमेश यादवने दोन तर रविंद्र जडेजा आणि रविचंद्रन आश्‍विनने प्रत्येकी एक गडी बाद केला.

Leave A Reply

Your email address will not be published.