नवी दिल्ली : देशातील रविवारी करोनच्या रुणांची संख्या 107 वर पोहोचली. यामध्ये सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असून त्या पाठोपाठ केरळचा क्रमांक लागतो.
भारतात आतापर्यंत 107 रुग्ण सापडले आहेत. त्यात दिल्ली आणि कर्नाटकमध्ये मृत्यू झालेल्या दोन व्यक्ती आणि 17 परदेशी व्यक्तींचा समावेश आहे. महाराष्ट्रात 31 जणांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर दिल्लीमध्ये 7, केरळम्ध्ये 22, उत्तर प्रदेश्त 11, कर्नाटकमध्ये 6 जणांच्या चाचणीत त्यांना करोना विषाणूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
याव्यतिरिक्त लडाखमध्ये 3, जम्मू काश्मीरमध्ये 2, तेलंगणमध्ये 3, राजस्थानमध्ये 2 रुग्ण आहेत. तामिळनाडू, आंध्रप्रदेश आणि पंजाबमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे.
करोनाचा प्रसार रोखण्यासाठी जेथे लोक मोठ्या संख्येने जमतात अशा सिनेमा हॉल आणि मॉल्स, तसेच शाळा व सार्वजनिक ठिकाणांवर असलेली बंदी घालण्याचे आदेश अधिक राज्यांनी दिले आहेत.