नवी दिल्ली – कॅन्सरच्या पेशंटचा जामीन रद्द करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावणाऱ्या ईडीच्या अधिाकाऱ्याला सर्वोच्च न्यायालयाने 1 लाख रूपयांचा दंड ठोठावला आहे. हा अत्यंत पोरकटपणा असल्याचे ताशेरेही न्यायलयाने ओढले आहेत.
संबंधित कॅन्सर रूग्णाला अलाहाबाद उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला होता. त्याला ईडीचे अधिकाऱ्याने कमाल एहसान याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. हा न्यायालयाच्या वेळेचा अपव्यय आहे. रूग्णाच्या जामीनाच्या विरोधात जी याचिका दाखल करण्यात आली आहे तो अत्यंत पोरकटपणा असल्याचे न्या. एम. आर. शहा आणि न्या. एम. एम. संदरेश यांच्या खंडपीठाने नमूद केले.