Tata Airbus Project : रोहित पवारांची राज्य सरकारवर टीका, म्हणाले “हे महाराष्ट्र सरकारचं अपयश नाही तर गुजरात…”

पुणे :- फॉक्सकॉन-वेदांता नंतर आता C-295 लष्करी ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्ट हा प्रकल्पही महाराष्ट्रातला प्रकल्प गुजरातला नेण्यात आला. यावरुन राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे. ज्याप्रमाणे रुपया कमजोर होत नसून डॉलर मजबूत होत आहे, त्याचप्रमाणे टाटा एअरबसचा 22 हजार कोटींचा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाणं हे महाराष्ट्र सरकारचं अपयश नाही तर गुजरात सरकारचं यश आहे, अशी उपरोधात्मक टीका रोहित पवार यांनी केली आहे.
ज्याप्रमाणे रुपया कमजोर होत नसून डॉलर मजबूत होत आहे, त्याचप्रमाणे टाटा एअरबसचा २२ हजार कोटींचा प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाणं हे महाराष्ट्र सरकारचं अपयश नाही तर गुजरात सरकारचं यश आहे. pic.twitter.com/cMaHEK3JxH
— Rohit Pawar (@RRPSpeaks) October 27, 2022
रोहित पवार यांनी पुढे म्हटले आहे की, गुजरात विधानसभेची निवडणुक जिंकण्यासाठी महाराष्ट्राच्या हक्काचे प्रकल्प एकापाठोपाठ एक गुजरातला नेले जात आहेत. यामुळं ती निवडणूक भाजपा कदाचित जिंकेलही परंतु या खेळात महाराष्ट्राच्या युवांचं भवितव्य चिरडलं जातंय आणि सर्वच राज्यकर्ते मात्र आपल्याच धुंदीत आहेत, हे दुर्दैव आहे, अशी खंत देखील त्यांनी व्यक्त केली आहे.
दरम्यान, फॉक्सकॉन, बल्क ड्रग पार्कनंतर आता टाटा एअरबसचा मालवाहू विमान बांधणी (Tata Airbus Project) करणारा प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातमध्ये गेला आहे. यावरून राज्यात राजकारण तापले आहे.
सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्यातील प्रकल्प गुजरातमध्ये जात असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. तर टाटा एअरबसचा एमओयू महाविकास आघाडी सरकार असताना झाला होता, असे स्पष्टीकरण उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले आहे.




