Sensex New Record Level । शेअर बाजारात आज नवा इतिहास रचला गेला असून BSE सेन्सेक्सने पहिल्यांदाच 75500 चा टप्पा ओलांडला आहे. बीएसई सेन्सेक्स ऐतिहासिक शिखरावर पोहोचला आहे. 75,525 या नवीन विक्रमी उच्च पातळीवर व्यवहार करत आहे. निफ्टीने प्रथमच 23000 ची पातळी ओलांडून 23,004.05 चा नवा उच्चांक गाठलाय.
सेन्सेक्स-निफ्टीची नवीन विक्रमी उच्च पातळी
आज सेन्सेक्सने 75,582.28 चा नवीन विक्रमी उच्चांक गाठला आहे. NSE निफ्टीने 23,004.05 चा ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. आजच्या व्यवहारात सेन्सेक्स आणि निफ्टी सातत्याने नवीन विक्रमी पातळी गाठत आहेत.
मिडकॅप निर्देशांकही नवीन उच्चांकावर Sensex New Record Level ।
शेअर बाजाराच्या इतिहासात पहिल्यांदाच मिडकॅप निर्देशांकाने 52,500 ची पातळी ओलांडून नवा विक्रमही रचला आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांच्या वाढीमुळे देशांतर्गत शेअर बाजाराला दीर्घ काळापासून पाठिंबा मिळत आहे. ज्याच्या जोरावर भारतीय बाजार इतिहास रचत आहेत.
बाजार कोणत्या स्तरावर खुले ? Sensex New Record Level ।
आज मात्र बाजाराची सुरुवात घसरणीने झाली. BSE सेन्सेक्स 82.59 अंकांनी किंवा 0.11 टक्क्यांच्या घसरणीसह 75,335 वर उघडला. NSE निफ्टी 36.90 अंकांनी किंवा 0.11 टक्क्यांनी घसरला आणि 22,930 च्या पातळीवर उघडला.
बीएसईचे बाजार भांडवल सर्वकालीन उच्च पातळीवर
बीएसईचे बाजार भांडवल विक्रमी उच्चांक गाठले आहे. प्रथमच, तो 421.09 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे आणि अशा प्रकारे प्रथमच बीएसईने 420 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त मार्केट कॅप गाठले आहे. सध्या बीएसईवर 3129 शेअर्सचे व्यवहार होत आहेत, त्यापैकी 1743 शेअर्स वाढत आहेत. घसरणाऱ्या शेअर्सची संख्या १२६३ असून १२३ शेअर्समध्ये कोणताही बदल झालेला नाही. 101 शेअर्सवर अप्पर सर्किट आणि 61 शेअर्सवर लोअर सर्किट लागू करण्यात आले आहे.
बाजार उघडल्यानंतर 40 मिनिटांनंतर शेअर बाजाराची स्थिती
सकाळी 9:54 वाजता, बीएसई सेन्सेक्समधील 30 पैकी 13 समभागांमध्ये वाढ आणि 17 समभाग घसरत आहेत. L&T हा टॉप गेनर आहे आणि त्यासोबत बजाज फायनान्स, एसबीआय, विप्रो, भारती एअरटेल आणि टाटा स्टीलच्या शेअर्समध्येही वाढ होत आहे. घसरलेल्या समभागांमध्ये सन फार्मा, टीसीएस, आयसीआयसीआय बँक, एम अँड एम आणि टायटन तळाला आहेत.
बँक निफ्टी आज 50,000 च्या जवळ
बँक निफ्टीने आज 48,976.70 ची उच्च पातळी गाठली होती आणि अशा प्रकारे तो प्रथमच 50 हजारांच्या ऐतिहासिक उच्च पातळीच्या जवळ आला होता. सध्या बँक निफ्टीच्या 12 पैकी 7 शेअर्स वाढीसह तर 5 शेअर्स घसरणीसह व्यवहार करत आहेत.