वडगाव मावळ – तालुक्यातील करोना रुग्णांची संख्या 2710 एवढी झाली आहे. मावळ तालुक्यात गुरुवारी सर्वाधिक 157 करोना रुग्ण आढळून आले आहेत. तर गुरुवारी 37 करोना रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे.
शहरी भागात 93 व ग्रामीण भागात 64 रुग्ण सापडले. गुरुवारी शहरी भागातील रुग्णसंख्या जास्त आहे. तर 4 रुग्णांचा करोनाने मृत्यू झाला. आतापर्यंत 103 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहरी भागात 1526 व ग्रामीण भागात 1184 रुग्ण आहेत. ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
तळेगाव दाभाडे शहरात सर्वाधिक 885 रुग्ण आहेत. लोणावळा 477 व वडगाव नगरपंचायत 166 रुग्ण आहेत. गुरुवारी तळेगाव दाभाडे शहरात 56 करोना रुग्ण मिळाले. लोणावळा नगरपरिषद हद्दीत 35 रुग्ण सापडले. वडगाव नगरपंचायत हद्दीत 2 रुग्ण सापडले. कुसगाव बुद्रुक 7, इंदोरी 7, वराळे 6, कोंडीवडे आमा 4, कडधे 3, सोमाटणे 3, शिरगाव 3, नायगाव 3, चिखलसे 3, काले 3, कार्ला 3, शिवली 3, धामणे, नवलाख उंब्रे, माळवाडी, कामशेत, उर्से, गहूंजे, सुदुंबरे, ब्राम्हणवाडी (साते), जांभूळ, दारुंब्रे, नाणे, वरसोली, कोथुर्ने, जांभवडे या गावांत प्रत्येकी 1 असे एकूण 157 करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले.