तेहरान – सरकारवर नेहमी टीका करण्यासाठी प्रसिद्ध असलेला रॅप गायक तौमाज सालेही याला इराणमधील न्यायालयाने देहदंडाची शिक्षा सुनावली आहे. भाषणाशी संबंधित आरोप त्याच्यावर ठेवण्यात आले आहे. त्याला सुनावण्यात आलेल्या शिक्षेमुळे मानवाधिकार संघटनांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ह्युमन राईट्स वॉच या आंतरराष्ट्रीय बिगरसरकारी संघटनेने ही माहीती दिली आहे.
तौमाज सलेहीविरोधीत इराणच्या रिव्होल्युशनरी कोर्टच्या ब्रँच १ ने देहदंडाची शिक्षा सुनावली आहे. पृथ्वीवरील भ्रष्टाचाराच्चा आरोपात त्याला दोषी ठरवण्यात आले आहे. या आरोपात देहदंडाची शिक्षा दिली जाऊ शकते. मात्र या निवाड्यामध्ये कायदेशीर त्रुटी असून या निकालाविरोधात अपील केले जाणार असल्याचे सलाहीच्या वकिलांनी म्हटले आहे.
मानवाधिकार संघटनांशिवाय ह्युमन राईट्स वॉचचे संशोधक तारा सेपेही फार यांनी इराणमधील न्यायव्यवस्थेकडून मूलभूत स्वातंत्र्याची पायमल्ली केली गेली आहे आणि पारदर्शक खटला चालवला गेला नसल्याची जोरदार टीका केली आहे. तौमाज सलाही याची त्वरित सुटका केली जावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
नैतिकता पोलिस कोठडीत कुर्दिश-इराणी महिला महसा जीना अमिनीच्या मृत्यूनंतर झालेल्या आंदोलनादरम्यान, ३० ऑक्टोबर २०२२ रोजी त्याला अटक करण्यात आली तेव्हा सालेहीवर कायदेशीर खटला सुरू झाला. त्याला कोठडीत डांबण्यात आले आणि त्याच्यावर पृथ्वीवरील भ्रष्टाचाराच्या आरोपाशिवाय इतर अनेक आरोप लावण्यात आले होते.
त्याला सुनावलेली ६ वर्षांची शिक्षा इराणच्या सर्वोच्च न्यायालयाने नोव्हेंबर २०२३ मध्ये रद्द ठरवली होती. तरी १२ दिवसांनी सालेहीला अटक केली गेली होती. त्याच्यावर नव्याने आरोप ठेवले गेले. त्यात दोषी ठरवून एक वर्षाची शिक्षा आणि २ वर्षांची प्रवास बंदी घालण्यात आली.
त्यानंतरही १८ एप्रिल २०२४ रोजी सालेहीवर नवीन खटला दाखल केला गेला आणि अतिरिक्त आरोप लावले गेले. या नवीन आरोपात दोषी ठरवून देहदंडाची शिक्षा सुनावली गेली आहे.