माहिरा खान पाकिस्तानी अभिनेत्री असली तरीही. पण तिचे चाहते जगभर आहे. नुकतीच ती तिच्या लग्नामुळे चर्चेत होती आणि आता एका कॉन्सर्टमुळे ती चर्चेत आली आहे. माहिरा खान दुबईत अरिजित सिंगच्या म्युझिकल कॉन्सर्टमध्ये दिसली होती. ज्याचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. अरिजीत तिच्या चित्रपटातील ‘जालिमा’ हे गाणेही गात आहे. मात्र, नंतर त्याने अभिनेत्रीची माफी मागितली कारण तो तिला ओळखू शकला नाही.
व्हायरल व्हिडिओमध्ये अरिजित सिंह म्हणाला,’मी या व्यक्तीला ओळखण्याचा प्रयत्न करत होतो, तेव्हा मला आठवले की मी तिच्यासाठी गाणे गायले होते. माहिरा खान माझ्या समोर बसली आहे. कल्पना करा, मी तिचे जालिमा हे गाणे गात होतो आणि हे तिचे गाणे आहे आणि ती देखील ते गाते आहे. ती समोर उभी होती पण मी तिला ओळखू शकलो नाही. मला माफ करा. मॅडम, धन्यवाद आणि खूप खूप धन्यवाद. हा व्हिडिओ पाहून चाहते वेडे झाले.
जेव्हा माहिरा खानची ओळख झाली आणि तिचा चेहरा मोठ्या पडद्यावर दाखवला गेला, तेव्हा तिने प्रथम प्रेक्षकांना हाथ दाखवला. आणि तिला लाज वाटली कारण संपूर्ण प्रकाश आणि लक्ष तिच्यावर होते.’ सध्या अरिजितच्या या व्हिडिओवर चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहे.