पिंपरी – श्री अग्रसेन ट्रस्ट चिंचवड- प्राधिकरण समितीच्या वतीने सध्या मोठ्या प्रमाणात अन्नदान करण्यात येत आहे. रोज सकाळी सुमारे पंधराशे तर सायंकाळी एक हजार नागरिकांना अन्नदान करण्यात येत आहे.
ट्रस्टचे कार्याध्यक्ष प्रेमचंद मित्तल यांनी दिलेल्या माहितीनुसार सुनील जयकुमार अग्रवाल यांच्या पुढकाराने गरजूंची भूक भागविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी आपल्या जीवाची पर्वा न करता अहोरात्र रस्त्यावर असणाऱ्या पोलीस आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना फळ आणि चहाचे वाटप करण्यात येत आहे.
ट्रान्सपोर्ट नगर, रावेत, पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या शाळेत असलेले नागरिक, गुरुकुलम आश्रम, विद्यानगर या भागांमध्ये वाटप करण्यात येत आहे. तसेच धान्याचे 3450 पॅकेट वितरित करण्यात आले आहे. तसेच शासकीय निर्देशानुसार अग्रसेन भवन येथे ओपीडी सुरु करण्यात आले आहे. येथे गोर-गरीब रुग्णांवर उपचार करत आहेत. अन्न अग्रसेन भवन येथे अन्न तयार करण्यात आले. हे सर्व कार्य महापालिका आणि पोलीस आयुक्त यांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करुन करण्यात येत आहे. हे कार्य लॉकडाऊन सुरु असेपर्यंत करण्यात येणार आहे. सर्व अग्रबंधू याच्यासाठी तन,मन,धनाने मदत करत आहेत आणि पुढेही करतील.
सुनील जयकुमार अग्रवाल यांच्या पुढकाराने आणि प्रेमचंद मित्तल, भीमसेन अग्रवाल, सुनील अग्रवाल, सतपाल मित्तल, जोगिंदर मित्तल, संदीप गुप्ता, मुकेश मित्तल, विनोद मित्तल, विनोद बन्सल, रमेश गोयल, अनिल तायल, सुजीत गर्ग, सुरेंद्र आगरवाल, संदीप, आशिष, नवीन बन्सल, पवन गोयल, लक्ष्मीनारायण, सुरेंद्र, सुशील, नितीन, लाजपत हे अग्रबंधु कार्यरत आहेत. तसेच टेम्पो मालक-चालक, केटरिंग सर्व्हिसेस आणि डिलिव्हरी स्टाफ यांचे सहकार्य लाभत आहे.