विवाहितेचा गर्भपात, पाच जणांवर गुन्हा

लासुर्णे-बोरी (ता. इंदापूर) येथे विवाहितेचा शारिरीक व मानसिक छळ करुन तिचा गर्भपात केल्याप्रकरणी वालचंदनगर पोलिसांनी पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. सागर भागवत मरळे, भागवत कृष्णा मरळे, मालन भागवत मरळे, दिपक भागवत मरळे व ज्योती दीपक मरळे (रा. सर्व बोरी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणी गौरी सागर मरळे (वय 25, रा. बोरी; सध्या रा. नातेपुते, ता. माळशिरस) यांनी वालचंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. 8 जानेवारी 2015 ते 31 ऑगस्ट 2018च्या दरम्यान गौरी हिला माहेराहून नवीन चारचाकी गाडी घेण्याकरीता तीन लाख रूपये आणण्यासाठी शिवीगाळ करुन शारिरीक व मानसिक छळ केला. तसेच गौरी हिच्या इच्छेविरूद्ध बारामती येथील खासगी हॉस्पिटलमध्ये गर्भपात केला. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजयकुमार धोतरे करीत आहेत.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×