ट्विटरवरून इम्रान खान यांचे काश्मीरच्या जनतेला भडकवण्याचे प्रयत्न सुरू

इस्लामाबाद- केंद्र सरकारने जम्मू काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 आणि 35अ रद्द केल्याने पाकिस्तानचा थयथयाट सुरू झाला आहे. हाच मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर घेवून जाऊन स्वत:चीच पाकने गोची करून घेतली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा ट्विटरवरून काश्मीरच्या जनतेला भडकवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

“लष्करी ताकदीचा वापर करून दहशतवाद्यांना हरवणे शक्य आहे मात्र, जेव्हा एखाद्या धर्माचे नागरिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी एकत्र येतात तेव्हा त्यांच्याविरुद्ध लढणे इतके सोप नसते”.असं ट्विट इम्रान खान यांनी केले आहे. आपल्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यापासून त्यांना कोणीच रोखू शकत नाही असं देखील इम्रान खान यांनी ट्विटरच्या माध्यमातून म्हंटल आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×