वाणेवाडीत आज लोकअदालत

सोमश्‍वरनगर – उच्च न्यायालय मुंबई विधी सेवा समिती व विधी सेवा समिती, बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने वाणेवाडी (ता. बारामती) येथे सोमवारी (दि. 24) माबाईल लोकअदालतचे आयोजन करण्यात आले असून पक्षकारांनी व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन बारामती वकील संघटनेचे अध्यक्ष ऍड. ज्ञानदेव रासकर यांनी केले आहे. निवृत्त जिल्हा न्यायाधीश डी. डी. कांबळे अध्यक्ष असलेल्या पॅनेलमध्ये ऍड. गणेश आळंदीकर व ऍड. बाळासाहेब शिंगाडे यांची नेमणूक करण्यात आली आहे. अतिरिक्‍त जिल्हा व सत्र न्यायालयातील तसेच दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर येथील प्रलंबित दाव्यांचे कामकाज यावेळी होणार असून वाणेवाडी, वाघळवाडी, निंबुत, करंजेपूल, गडदरवाडी, मुरुम, करंजे आदी परिसरातील ग्रामपंचायतीची महावितरणच्या दाखलपूर्व प्रकरणांचा निपटारा करण्यात येणार आहे. तसेच मंगळवारी (दि. 25) शिरवली येथे या मोबाईल लोकअदालतीद्वारे विधी साक्षरता शिबिर आयोजित करण्यात आले असून, सकाळी साडेनऊ वाजता दोन्ही दिवस कामकाज सुरू राहणार आहे. शिरवली येथे महिलांविषयीचे कायदे व मोटार अपघात कायदेबद्दल नागरिकांना मार्गदर्शन केले जाणार असून नागरिकांनी व पक्षकारांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन विधी सेवा समिती बारामतीचे अध्यक्ष जिल्हा न्यायाधीश आर. बी. देशपांडे, वकील संघटना अध्यक्ष ऍड. ज्ञानदेव रासकर, सचिव ऍड. पंकज काटे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.