चाकण – लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी बलात्कार करून व मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी येथील एका होमगार्डवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अक्षय गजानन खोपडे (रा. खराबवाडी, चाकण, ता.खेड) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. तर पीडित तरुणीने फिर्याद दिली आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, मागील एक वर्षांपासून मे 2019 च्या पहिल्या आठवड्यात चाकण येथील एमआयडीसीतील व वाकी खुर्द येथील लॉजवर अक्षयने पीडित तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी बलात्कार केला. तसेच एका निर्जन स्थळी अक्षयला संबंधित तरुणीने लग्नाबाबत वारंवार विचारणा केली असता अक्षयने तरुणीला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादित नमूद केले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक शिंदे पुढील तपास करीत आहेत.