वरवंड ग्राम शिक्षण संस्थेत उच्च शिक्षणही उपलब्ध

यवत / वरवंड, दि. 1 (वार्ताहर) – वरवंड (ता. दौंड) आणि पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या मुलांना गावातच दर्जेदार शिक्षण मिळावे ही संकल्पना घेऊन 1 ऑगस्ट 1963 मध्ये कै. एकनाथ सीताराम दिवेकर यांनी वरवंड ग्राम शिक्षण संस्थेची स्थापना करून माध्यमिक शिक्षणाचे कार्य सुरू केले. या संस्थेचा 56 वा वर्धापन दिन आज (दि. 1) उत्सहात साजरा करण्यात आला. यावेळी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै. एकनाथ सिताराम दिवेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

1993 मध्ये एकनाथ सीताराम दिवेकर या नावाने वरिष्ठ महाविद्यालय सुरू झाले असून, आता कला, वाणिज्य, विज्ञान, बीबीए, बीसीए, तसेच एमए, एमकॉम, एमएस्सी असे पदव्युत्तर अभासक्रमही या महाविद्यालयात सुरू आहेत. संस्थेचे अध्यक्ष संजय दिवेकर, डॉ. विजय दिवेकर, तसेच विश्वस्त मंडळाने 2019 या शैक्षणिक वर्षामध्ये फार्मसी कॉलेजची स्थापना केली आहे. यावेळी महाविद्यालय विकास समिती सदस्या योगिनी दिवेकर, संस्थेचे विश्वस्त गणपतराव दिवेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एल. के शितोळे, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.