जिजामाता स्कूलच्या सात विद्यार्थ्यांना पुरस्कार

भोर- येथील राजगड ज्ञानपीठ संचलित जिजामाता इंग्लिश मीडियमचे सात विद्यार्थी पुणे जिल्हा स्काऊट आणि गाईडने आयोजित केलेल्या मैदानी परेडमध्ये सर्वोत्कृष्ठ कॅंडेट ठरले आहेत. पुणे येथे स्मृतिचिन्ह, प्रशस्तीपत्र देवून त्यांचा सन्मान करण्यात आला, अशी माहिती विद्यालयाचे स्काऊट गाईडचे प्रशिक्षक संजय खरमरे यांनी दिली. सन्मानार्थी विद्यार्थ्यांमध्ये राजू शंकर चौधरी, अलोक रुपेश शिंदे, भाग्यश्री दत्तात्रय पडवळ, आदित्य विठ्ठल खोपडे, संकेत संजय खोपडे, ओंकार दत्तात्रय पडवळ, नुतन गणेश पवार व दुर्वांकिता संजय कुंभार यांचा समावेश आहे.

जिजामाता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या या यशाबद्दल प्राचार्या रुबिना सय्यद यांनी पुरस्कार प्राप्त सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. राजगड ज्ञानपीठाचे संस्थापक माजी मंत्री अनंतराव थोपटे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे कौतूक करुन शुभेच्छा दिल्या आहेत.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)