जागृती महाजन यांना उत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार

मंचर- आंबेगाव तालुक्‍यातील लांडेवाडी येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या शिक्षिका जागृती महाजन यांनी लेखन व दिग्दर्शन केलेल्या अमर अकबर अँथनी या हिंदी नाटिकेला जिल्हास्तरावर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. संस्थाचालक, विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी शिक्षिका जागृती महाजन यांचे अभिनंदन केले. पुणे जिल्हा परिषद आयोजित यशवंतराव चव्हाण आणि पु. ल. देशपांडे करंडक आंतरशालेय बाल नाट्य स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा निगडी येथील प्रेरणा विद्यालय येथे संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून ज्येष्ठ सिने अभिनेत्री आशा काळे उपस्थित होत्या. या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, प्राचार्या शबनम मोमीन, उपप्राचार्या रजनी बाणखेले यांच्यासह सर्व सहकारी शिक्षक व विद्यार्थ्यांनी जागृती किरण महाजन यांचे अभिनंदन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.