#IPL2019 : दिल्लीचा कोलकातावर दणदणीत विजय

कोलकाता – शिखर धवनचे दमदार अर्धशतक आणि ऋषभ पंतच्या फटकेबाजीच्या बळावर दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाईट रायडर्सचा 7 गडी आणि 7 चेंडू राखून पराभव करत आगेकूच केली.

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने 20 षटकांत 7 बाद 178 धावांची मजल मारत दिल्लीसमोर विजयासाठी 179 धावांचे आव्हान ठेवले. प्रत्युत्तरात खेळताना दिल्लीने जोरदार सुरुवात केली. मात्र, 3 षटकांत 32 धावांची सलामी दिल्यानंतर पृथ्वी शॉ 14 धावांवर परतला. तर, कर्णधार अय्यर देखील केवळ 6 धावा करून बाद झाला. त्यामुळे धडाकेबाज सुरुवातीनंतरही दिल्लीची 2 बाद 57 अशी अवस्था झाली.

यानंतर शिखर धवन आणि ऋषभ पंत यांनी फटकेबाजी करत 11.2 षटकांतच दिल्लीचे शतक फलकावर लगावले. यावेळी पंत आणि शिखर धवन यांनी 11.3 षटकांत 105 धावांची भागीदारी करत दिल्लीला विजयाच्या समीप आणले. मात्र, मोठा फटका खेळण्याच्या नादात पंत 46 धावांवर बाद झाल्यानंतर आलेल्या इन्ग्रामने धवनच्या साथीत दिल्लीला 18.5 षटकांत 180 धावांची मजल मारून देत दिल्लीला विजय मिळवून दिला. यावेळी धवनने नाबाद 97 धावांची खेळी केली.

तत्पूर्वी, कोलकाताचा सलामीवीर जो डेनली पहिल्याच चेंडूवर परतल्याने कोलकाताला पहिला धक्‍का लवकरच मिळाला. यानंतर आलेल्या रॉबिन उथप्पाला साथीत घेत शुभमन गिलने कोलकाताचा डाव सावरायला सुरुवात केली. या दोघांनी कोलकाताला पॉवर प्लेच्या सहा षटकांमध्ये 41 धावांची मजल मारून दिली. मात्र, उथप्पा 28 धावांची खेळी करून बाद झाला. तर, नितीश राणा 11 धावावर परतला. त्यानंतर रसेलच्या साथीत गिलने संघाचा डाव सावरत आपले अर्धशतक झळकावले. मात्र, 65 धावा करून तो बाद झाला. तो बाद झाल्यानंतर रसेल आणि पियुष चावलाने फटकेबाजी करत दिल्लीला 178 धावांची मजल मारून दिली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)