गुळुंचे येथे पाडव्याला ग्रंथालयाला पुस्तकांचे तोरण

नीरा- गुळुंचे (ता. पुरंदर) येथे कै. सोमनाथ कुंभार आणि कै. विनोद जाधव यांच्या स्मरणार्थ सुरू केलेल्या सार्वजनिक तसेच स्पर्धा परीक्षा ग्रंथालयात गुडीपाडव्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रंथालयाच्या वतीने पुस्तकांचे तोरण ग्रंथालयाला बांधून पुस्तकांप्रती तरुणांचे आकर्षण वाढविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात आले. यावेळी कथा, कविता, चरित्रे, आत्मचरित्रे आदी पुस्तके वाचकांना पाहता यावीत, यासाठी दर्शनी भागात लावण्यात आली होती.

ग्रंथालयाचे ग्रंथपाल निखिल खोमणे तसेच सहकारी रणजित सावंत यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शाखाप्रमुख अक्षय प्रदीप निगडे, ग्रंथालय समितीचे अध्यक्ष नितीन निगडे, निखिल खोमणे, पोपट पाटोळे, संजय चव्हाण, किशोर गोरगल, अक्षय निगडे, पोलीस पाटील दीपक जाधव, छगन नलवडे, नारायण वाघमोडे, संतोष जाधव, अमोल निगडे आदी उपस्थित होते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.