इंदापूर तालुक्‍यात डाळिंबावर तेल्याचा प्रादुर्भाव

लासुर्णे – इंदापूर तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात डाळिंब पिकावर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव होण्यास सुरूवात झाली आहे. तेल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे.

इंदापूर तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील लासुर्णे, बोरी, बेलवाडी परिसरात यावर्षी अद्यापही दमदार पाऊस झालेला नाही. परिसरातील ओढे-नाले भरून वाहिले नसल्याने विहिरींची पाणी पातळी कमीच आहे. दमट वातावरण व वारंवार येणाऱ्या पावसाच्या हलक्‍या सरीमुळे डाळिंब पिकावर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव होण्यास सुरूवात झाली आहे. विविध प्रकारच्या रासायनिक व जैविक औषधांची फवारणी करून देखील तेल्या रोगाचा प्रादुर्भाव कमी होत नसल्याने शेतकरी हतबल झाला आहे. या वर्षी पडलेल्या दुष्काळामध्ये शेतकऱ्यांनी उन्हाळ्यात पाणी विकत घेऊन डाळिंब बागा जगविल्या आहेत. इंदापूर तालुक्‍यात तेल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊन शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)