#व्हिडीओ : महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये 2000 प्रवासी अडकले; मदतकार्य सुरू

कोल्हापूर – मुंबई परिसरात शुक्रवारी संध्याकाळपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचे पाणी साचल्याने अनेक रेल्वे स्थानकातील रूळ जलमय झाले आहेत. त्यामुळे रेल्वे तसेच लोकल सेवेला फटका बसला आहे. काल रात्री साडेआठ वाजता मुंबईहून कोल्हापुरकडे रवाना झालेल्या महालक्ष्मी एक्सप्रेसच्या काही डब्यांमध्ये बदलापूर-कर्जत मार्गावरील वांगणी रेल्वे स्थानकाजवळ पाणी शिरले. त्यामुळे ही रेल्वे स्थानकातच थांबविण्यात आली. परिणामी या रेल्वेतील दोन हजार प्रवाशांना याचा फटका बसला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव तात्काळ ठाणे व कल्याण येथील आपत्ती व्यवस्थापन व एनडीआरएफच्या पथकाला पाचारण करण्यात आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.