वाल्हे – आडाचीवाडी (ता. पुरंदर) येथे खराडी पुणे येथील संकल्प युवा फाऊंडेशन व दिशा फाऊंडेशन यांच्या वतीने आडाचीवाडी येथील परिसरातील गरीब व गरजू शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. आडाचीवाडी येथील श्री भैरवनाथ मंदिरामध्ये जिल्हा परिषद सदस्या शालिनी पवार यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. याप्रसंगी युवा फाऊंडेशनचे अध्यक्ष पवन गिते, आडाचीवाडीचे सरपंच दत्तात्रय पवार, उपसरपंच अलका पवार, तंटामुक्ती उपाध्यक्ष मोहन पवार, सागर मुळीक, संदिप पवार, मयुर पवार, पवन नागरे, ओंकार राऊत, ओमकार पिसे, आमोल गव्हाणे, अविनाश देशमुख,अभिषेक मेहे व आडाचीवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संकल्प युवा फाऊंडेशनचे अध्यक्ष पवन गिते यांनी प्रास्ताविक केले. सरपंच दत्तात्रय पवार यांनी आभार मानले.