अहमदाबाद – काँग्रेस अध्यक्षपदाचा नुकताच राजीनामा दिलेले काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना आज अहमदाबाद जिल्हा न्यायालयाने मानहानीच्या खटल्यामध्ये जामीन मंजूर केला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, अहमदाबाद जिल्हा बँक व या बँकेचे अध्यक्ष अजय पटेल यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल केला होता. न्यायालयाने सदर खटल्याच्या सुनावणीवेळी राहुल गांधी यांना उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते.
दरम्यान, आज अहमदाबादेतील जिल्हा न्यायालयाने या खटल्याबाबत सुनावणी करताना राहुल गांधी यांना जमीन मंजूर केला आहे. तत्पूर्वी राहुल गांधी यांना अशाच एका प्रकरणामध्ये बिहार येथील पाटणा न्यायालयाने देखील नुकताच जमीन मंजूर केला आहे.