टोलनाका कर्मचाऱ्याला मारहाण; भाजप खासदाराविरुद्ध गुन्हा

आग्रा – आग्रा येथील टोल नाक्‍यावरील कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी भाजपचे इटावा येथील खासदार रामशंकर कथेरिया व एका अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दंगल, दुखापत करणे यासह शस्त्रविषयक कायद्याखाली आग्रा पोलिसांनी ही कारवाई केली.

शनिवारी सकाळी घडलेल्या या घटनेच्या सीसीटीव्ही चित्रीकरणातील दृश्‍यात एक व्यक्ती टोल नाक्‍याच्या कर्मचाऱ्याला थापड मारताना दिसते. त्यानंतर लगेच खासदारांच्या सुरक्षा ताफ्यातील एक इसम हवेत गोळीबाराच्या दोन फैरी झाडतो. कर्मचाऱ्याला थापड मारणारी व्यक्ती खासदार आहे, की त्यांचा सुरक्षा कर्मचारी, हे आपण तपासून पाहात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

हे व्हिडीओ चित्रीकरण पुरावा म्हणून सादर करण्यात आले असून आम्ही ते तपासून पाहात आहोत. टोल नाक्‍याच्या कर्मचाऱ्यांनी एफआयआर दाखल केला आहे. जखमी कर्मचाऱ्याला वैद्यकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. यानंतर, तक्रारीत केलेले दावे पडताळून पाहण्यात येणार असून कायदेशीर पाऊल उचलले जाईल, असे अतिरिक्त पोलीस अधीक्षक (पश्‍चिम आग्रा) रवी कुमार यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)