#CWC19 : भारताचे फिटनेस ट्रेनर संघाची साथ सोडणार

विश्‍वचषकानंतर विश्रांतीसाठी घेतला निर्णय

नवी दिल्ली – भारतीय संघाचे फिटनेस ट्रेनर शंकर बसु आणि फिजिओ पॅट्रिक फारहार्ट यांनी विश्‍वचषकानंतर संघासोबत नव्याने करार न करण्याचा निर्णय घेतला आहे. तशी कल्पना त्यांनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळालाही दिली आहे. बीसीसीआयने करारात वाढ करण्याचा प्रस्ताव त्यांना दिला होता, परंतु दोघांनीही तो अमान्य केल्याचे वृत्त पीटीआयने दिले आहे.

या संदर्भात बोलताना बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की, फिटनेस ट्रेनर म्हणून यापुढे संघासोबत काम न करण्याचे बसु यांनी संघ व्यवस्थापनाला सांगितले आहे. त्यांना विश्रांतीची आवश्‍यकता आहे. पॅट्रीक यांनीही हिच भूमिका घेतली आहे. विश्‍वचषक आणि वेस्ट इंडिज मालिकेनंतर त्यांच्या रिप्लेसमेंटचा विचार केला जाईल.

दरम्यान भारतीय खेळाडूंच्या तंदुरूस्तीचा स्तर उंचावण्यामागे या दोघांची महत्त्वाची भूमिका आहे. शंकर बसु यांनीच यो-यो टेस्ट अनिवार्य केली होती. विराट कोहलीच्या फिटनेसचेही श्रेय बसु यांनाच जाते आणि कोहलीनेही ते कबुल केले आहे. कोहली म्हणाला होता की, मैदानावरील माझी ऊर्जा आणि शारीरिक परिवर्तनामागे बसु आहेत. त्यांनी मला फिटनेस संदर्भात बरेच काही शिकवले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.