पाच वर्षांत कापड उत्पादनात खादीचा टक्‍का वाढला

नवी दिल्ली – एकूण कापड उत्पादनात खादीचे प्रमाण 5 वर्षांत दुप्पट वाढून 8.49 टक्‍के इतके झाले आहे. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने दिलेल्या माहितीनुसार 2014-15 मध्ये एकूण कापड उत्पादन 2,486 दशलक्ष वर्ग मीटर एवढे होते. त्यात खादीचा वाटा 105.38 दशलक्ष वर्ग मीटर होता. हे प्रमाण त्यावेळी 4.23 टक्‍के इतके होते.

2018-19 मध्ये एकूण कापड उत्पादनात कारखान्यात तयार झालेल्या कापडाचे प्रमाण 2,012 दशलक्ष वर्ग मीटर इतके होते. तर खादीचे प्रमाण 170.80 दशलक्ष वर्ग मीटर होते. याचा अर्थ एकूण कापड उत्पादनात खादीचे प्रमाण या 5 वर्षांत दुपटीने वाढले आहे. या काळात केंद्र सरकारने खादी उत्पादन आणि विक्रीला चालना दिल्यामुळे ही शक्‍य झाले असल्याचे आयोगाचे अध्यक्ष विनयकुमार सक्‍सेना यांनी सांगितले. 1956 पासून 2013-14 पर्यंत खादीचे उत्पादन 105.38 दशलक्ष वर्ग मीटर झाले. पाच वर्षात 65.40 दशलक्ष वर्ग मीटरची भर पडली आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here