ब्रह्म दत्त होणार येस बॅंकेचे आगामी अध्यक्ष

नवी दिल्ली – येस बॅंकेकडून नवीन अध्यक्ष पदासाठी भारतीय रिझर्व्ह बॅंकेकडे ब्रह्म दत्त यांच्या नावाची शिफारस केली असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. नोव्हेंबर 2018 मध्ये येस बॅंकेचे चेअरमनपद रिक्‍त झाले होते.

अशोक चावला यांनी आपल्या चेअरमन पदाचा राजीनामा दिल्यानंतर येस बॅंकेचे चेअरमनपद रिक्‍तच राहिले होते. त्यानंतर दत्त यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. दत्त हे पूर्वीपासून येस बॅंकेतच कार्यरत आहेत.

त्यामुळे बॅंकिंग प्रणालीला ते खूप जवळून ओळखत असल्याने त्यांना या पुढील कार्यकाळ समधानकारक जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यांनी या अगोदर स्वतंत्र निर्देशक म्हणून काम पाहिले आहे. बॅंकेत आणखी काही नियुक्‍त्या होणे शक्‍य आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)