माजी पं. स. सदस्यासह सात जणांवर ऍट्रॉसिटी

राजेगावात तरुणास बेदम मारहाण, अर्वाच्य भाषेत शिवीगाळ

दौंड- राजकीय आकासापोटी राजेगाव (ता. दौंड) येथील तरुणास रविवारी (दि. 26) जातीवाचक अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून बेदम मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी माजी पंचायत समिती सदस्यासह सात जणांवर दौंड पोलीस ठाण्यात सोमवारी (दि. 27) अनुसूचित जाती-जमाती कायद्यांतर्गत करण्यात आला आहे.

विशाल वैजनाथ लोंढे (वय 27) या तरुणासा मारहाण करण्यात आली असून त्यांनीच फिर्याद दिली आहे. तर माजी पंचायत समिती सदस्य नवनीत विलास जाधव,सागर विलास जाधव,श्रीनाथ सुभाष जाधव,आनंद रविंद्र जाधव,राजकुमार मोहन जाधव,मनोज रामदास जाधव व युवराज अशोक मोरे (रा.सर्व राजेगाव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, राजेगाव येथे रविवारी एका लग्न समारंभाचा कार्यक्रम उरकल्यानंतर लोंढे घरी निघाले असताना वरील सात आरोपींनी त्यांना अडवले व “तू ठाकर समाजाचा आहे, राजकीय धार्मिक सामाजिक व गावातील इतर कार्यक्रमाला यायचे नाही, आला तर तुझे हातपाय तोडून टाकू, तुझे घरही जाळून टाकू’ अशी धमकी दिली व गावात येण्यास मज्जाव करीत मारहाण करून अर्वाच्य भाषेत शिव्या दिल्या. यावेळी लोंढे यांचे चुलते नवनाथ लोंढे व चंद्रकांत मोरे यांनी हे भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी या आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ केली. आम्ही ठाकर असल्याने आमच्या वस्तीवर बहिष्कार टाकण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास दौंड पोलीस करीत आहेत.

  • हे कृत्य समाजाला बाधक
    राजकीय आकसापोटी जबाबदार पदाधिकाऱ्यांनीच असे वर्तन केल्यास सामान्य नागरिकांनी यातून काय बोध घ्यावा? शुल्लक कारणावरून टोळक्‍याच्या माध्यमातून दहशत निर्माण केल्यामुळे गावाची शांतता भंग होते शिवाय अशा घटनांनी राजकीय गटा-तटांमध्ये वाद-विवाद होण्यास खतपाणी मिळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)