बोहल्यावर चढण्यापूर्वीच राबविली स्वच्छता मोहीम

सोरतापवाडीतील सरपंचाची उपक्रम

उरुळी कांचन- सोरतापवाडी येथील सरपंच व पुणे जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष सुदर्शन चौधरी यांनी लग्नाच्यादिवशी गावात त्या स्वच्छता अभियान केले. त्यामुळे शिवाजी महाराज व तानाजी मालुसरे यांच्या कार्याला उजाळा मिळाला. “आधी लग्न कोढण्याचे’ त्याप्रमाणे आधी गाव स्वच्छता करून नंतर लग्नाला जाऊ. लग्नाच्या दिवशी नवरा-नवरीची वेगळीच लगबग असते. पै-पाहुणेही नवरा-नवरीला कोणतेच काम सांगत नाहीत. मात्र, सोरतापवाडीचे सरपंच आणि भारतीय जनता युवा मोर्चाचे पुणे जिल्हाध्यक्ष सुदर्शन चौधरी यांनी मात्र लग्नाच्या दिवशीही आपले नेहमीच काम टाळले नाही. त्यांनी गावातील साप्ताहिक स्वच्छता मोहीम आज सलग 83 व्या आठवड्यात राबवली. रविवार (दि.13) संध्याकाळी लग्न सोहळ्यात सनई, चौघडे वाजण्याआधी गावातील कचरा सकाळी साफ केला. त्यांच्या भावी पत्नी प्रियांका मेदनकर या देखील भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश सचिव आणि खेड तालुक्‍यातील मेदनकरवाडी गावच्या सरपंच आहेत. दोघेही भाजपचे सरपंच, दोघेही भाजयुमोचे पदाधिकारी यामुळे पुणे जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांत या विवाहाची चर्चा झाली. दोघेही सरपंच म्हणून 2020 पर्यंत पदावर राहणार आहेत. सोरतापवाडी गावचे सरपंच सुदर्शन चौधरी हे आपल्या गावात गेली 82 आठवडे स्वच्छता मोहीम राबवत आहे. आज त्यांचे लग्न असल्याने ते यास सुट्टी देतील, अशी चर्चा होती. मात्र, त्यांनी नेहमीच्या रविवारप्रमाणे गावातील तरुणांना एकत्र करून गाव स्वच्छ केले. सीएम चषक, गणेश फेस्टिवल आदी विविध कार्यक्रम राबविण्यात ते अग्रेसर असतात.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)