पानशेत… 

माधव विद्वांस 

12 जुलै 1961, त्यादिवशी ज्येष्ठ महिन्याची अमावास्या होती योगायोग पहा, आजही ज्येष्ठ महिन्याची अमावास्या आहे. प्रामुख्याने पुणे शहराला पाणीपुरवठा करणे व शेती सिंचन यासाठी पुण्यापासून 38 किलोमीटर अंतरावर पानशेत धरण बांधण्यात आले. 10 ऑक्‍टोबर 1957 रोजी पानशेत धरणाच्या बांधकामाला सुरुवात झाली. किमान 11 टीएमसी क्षमतेचे हे धरण प्रस्तावित मुदतीनुसार जून, 1962 पर्यंत बांधून पुरे होणार होते. मात्र, प्रत्यक्षात 1961 पर्यंत करणेचा प्रयत्न येथे झाला. मुदतीपूर्व काम पूर्ण करणे प्रतिष्ठेचे असले तरी योग्य ती काळजी घेतली असती तर अभियंत्यांना मानाने मिरवता आले असते. जगात धरणे अनेक आहेत त्यातील नैसर्गिक कारणाने फुटल्याची पण उदाहरणे आहेत. पण मानवनिर्मित चुकांमुळे पानशेत धरण 12 जुलै 1961 रोजी सकाळी 7 वाजून 10 मिनिटांनी फुटले या गोष्टीला आज 57 वर्षे झाली. सर्वसाधारणपणे जुलै महिन्याचे अखेरीस धरणे भरत येतात, पण त्यावेळी पाऊस भरपूर झाल्याने धरणात पाणी लवकर आलेले दिसते.

हे जरी खरे असले तरी धरणाची आवश्‍यक कामे 7 जूनपूर्वीच होणे गरजेचे होते. मात्र, 11 जुलैपर्यंत जूनच्या अखेर प्रचंड पावसामुळे धरणाच्या मागच्या तलावातील पाण्याची पातळी 30 मीटरने वेगाने वाढली.

दिनांक 10 जुलै रोजी पानशेत तलाव पूर्ण भरला. धरणाच्या तळाशी असलेला उलट्या यू आकाराचा बोगद्याचे तोंडावरील दरवाजा उघडला न गेल्याने अपेक्षित जादा पाणी बाहेर जाऊ शकले नाही व आतील पातळी वाढून धरणावरून पाणी वाहिले. बोगद्याच्या तोंडाशी लावलेला दरवाजाही अर्धवट स्थितीत लोंबकळत ठेवला गेला होता.

दरवाजा वर-खाली करायची यंत्रणा कार्यान्वित झालेली नव्हती. हीच उणीव धरण फुटीस कारणीभूत झाली. मातीचे धरण असल्याने धरण फुटण्यास वेळ लागला नाही. सकाळी आठ वाजता पाणी खडकवासला धरणात पोहोचले. काही वेळ खडकवासला धरणामुळे पाणी थोपविले गेले. मात्र, नंतर तेथेही भगदाड पडले व लोंढा पुण्याकडे मार्गस्थ झाला.

साधारण 11 ते 12 दरम्यान लोंढा शिवाजी पुलावर आदळला. नेहमीच्या पूररेषेपेक्षा 25 फूट उंच पूर आला होता. नारायण पेठ पुलाची वाडी, ओंकारेश्‍वर मंदिर, नेने घाट, कसबा- मंगळवार पेठ हे भाग पाण्याखाली गेले. ऐतिहासिक शनिवारवाड्याची भिंतही क्षतिग्रस्त झाली. 70 हजारचे वर लोकांना याची झळ पोहोचली अनेकजण विस्थापित झाले. अनेकजण जखमी झाले. प्रलय तांडवात ओंकारेश्‍वराचा नंदी पण लांब फेकला गेला.

पुनर्वसन कार्यासाठी स. गो. बर्वे यांची नेमणूक करणेत आली. लष्कराचे साहाय्याने पुनर्वसन करणेत आले म्हणून सेनादत्त पेठ असे नामकरण झाले. सध्या त्यावेळच्या 1/2 निसान हट्‌स दिसतात. चूक कोणाची यावर नेहमीप्रमाणे चर्चा होतच राहिल्या. चौकशी आयोगही नेमले गेले प्रत्यक्ष स्वतःची कातडी बचावून दुसरा कसा दोषी हेच सांगत राहिला. वर्तमानपत्रातूनही उलटसुलट मते व्यक्‍त होतच होती. मात्र, निष्काळजीपणा हा मानव निर्मितीच होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)