पाकिस्तानच्या मदतीनेच लादेनचा खात्मा – इम्रान खान

वाशिंग्टन – पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान सध्या अमेरिका दौऱ्यावर असून या दौऱ्यादरम्यान त्यांनी एका स्थानीक वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत अल कायदाचा म्हेरक्‍या ओसामा बिन लादेन संबधीत मोठा खुलासा केला आहे. देशातील गुप्तचर संघटना आयएसआयनेच अमेरिकेला लादेनबद्दल माहिती दिली होती, असा दावा त्यांनी या मुलाखतीत केला आहे.

यावेळी त्यांनी सांगितले की, देशातील गुप्तचर संघटना आयएसआयने ओसामा बिन लादेन पकडला जावा यासाठी त्याच्याशी संबंधीत संपूर्ण माहिती अमेरिकेतील हेरखाते सीआयएला दिली होती. फोन कनेक्‍शनच्या माध्यमातून आयएसआयने सीआयएला लादेनच्या जागेची माहिती पुरवली असेही त्यांनी यावेळी सांगितले. लादेनला पकडण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पाकिस्तानी डॉक्‍टर शकील अफ्रिदी याची सुटका करणार का ? या प्रश्नावर इम्रान खान यांच्याकडून उत्तर देण्यात आले.

महत्त्वाचे म्हणजे याआधी नेहमीच पाकिस्तानने आपल्याला ओसामा बिन लादेनसंबंधी कोणतीही माहिती नव्हती असा दावा केला होता. मात्र, पहिल्यांदाच जाहीरपणे पाकिस्तानने ओसामा बिन लादेन आपल्या भूमीवर असल्याची कल्पना असल्याचे सांगितले आहे. यावेळी इम्रान खान यांनी लादेनविरोधात करण्यात आलेल्या कारवाईत पाकिस्तानने मदत केल्याचेही सांगितले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)