चिंबळी-येथील परिसरात सायंकाळी सातच्या सुमारास पावसाने हजेरी लावली. गतवर्षी फार कमी प्रमाणात पाऊस पडला असल्याने उन्हाळ्यात त्याच्या झळा सोसाव्या लागल्या आहेत. गेल्या दोन दिवसांपासून हवामानात बदल होऊन गुरूवारपासून सकाळी सात वाजल्यापासून ढगाळ वातावरण निर्माण होत असल्यामुळे शेतकऱ्यांची आकाशाकडे नजर होती. शुक्रवारी दिवसभरच मोठ्या प्रमाणात आकाशात ढगाळ वातावरण होते. उकाडाही वाढला होता. सायंकाळी सहाच्या सुमारास आकाशात पावसाचे वातावरण निर्माण होऊन सुसाट वारे वाहू लागल्याने शेतकरी वर्गाची धांदल उडाली. सानंतर सातच्या समारास विजांया कडकडाटासह पावसाने हजेरी लावली.