गणेश पेठेत वादग्त वधूचा खून ; सासूवर वार

गणेश पेठेत वादग्त वधूचा खून ; सासूवर वार
पुणे,दि.23- वादग्त वधू आणी सासूवर एका तरुणाने चाकूने सपासप वार केले. यामध्ये वादग्त वधूचा जागीच मृत्यू झाला तर तीची आई गंभीर जखमी झाली. ही घटना गणेश पेठेतील नाडेगल्लीत मंगळवारी दुपारी घडली. याप्रकरणी आरोपी तरुणाला फरासखाना पोलिसांनी अटक केली.

या घटनेत नाझनीन सादिक शेख(18) हिचा मृत्यू झाला तर फैमीदा सादिक शेख(45) हि गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी शरीफ रज्जाक शेख (18,रा.कोंढवा) याला फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फैमीदा या शरीफ याची आत्या आहेत. त्यांची मुलगी नाझनीनचा शरीफ बरोबर नोव्हेंबरमध्ये विवाह ठरला होता. विवाहासाठी खरेदीही झाली होती. मात्र विवाहाची तारीख लांबत असल्याचे शरीफ याची त्यांच्याबरोबर अनेकदा वादावादी होत होती. दरम्यान मंगळवारी दुपारी शरीफ नाझनीनच्या घरी आला होता. यावेळी फैमीदा याही घरीच होत्या. त्यांच्यामध्ये एक दोन तास विवाहाबद्दल चर्चा झाली. यानंतर तीघेही घरातून बोलत बाहेर पडले. घराच्या जवळील गल्लीत आल्यावर त्यांच्यात पुन्हा कुरबुर झाली. यावेळी शरीफने रागच्याभरात लपवून ठेवलेला चाकू बाहेर काढत नाझनीनच्या पोटात खुपसला, फैमीदा यामध्ये पडल्या असता त्यांच्या तोंडावरही चाकूने सपासप वार केले. या दोघींची आरडा ओरडा ऐकताच गल्लीतील सर्व नागरिक धावतच घराबाहेर आले. त्यांनी दोघींनाही तातडीने रुग्णलयात दाखल केले. रुग्णलयात दाखल केल्यावर नाझनीनला मृत घोषीत करण्यात आले. तर फैमीदा यांच्यावर ससून रुग्णलयात उपचार सुरु आहेत. आरोपीला घटना घडलेल्या गल्लीतच पोलिसांनी पकडले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नावंदे यांनी दिली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)