Youngest Billionaire List 2024: फोर्ब्सने नुकतीच जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींची यादी जाहीर केली आहे. यामध्ये एकूण 2781 जणांना स्थान मिळाले आहे. या यादीत 19 वर्षांच्या मुलीनेही स्थान मिळवले आहे. फोर्ब्सच्या अब्जाधीशांच्या यादीनुसार, केवळ 19 वर्षांची ब्राझीलची विद्यार्थिनी लिव्हिया वोग्ट हिला जगातील सर्वात तरुण अब्जाधीश होण्याचा मान मिळाला आहे. याआधी हे विजेतेपद 19 वर्षीय इटालियन तरुणी क्लेमेंटे डेल वेचियोच्या नावावर होते. ती लिव्हिया व्होग्टपेक्षा फक्त दोन महिन्यांनी मोठी आहे.
Livia Voigt कोण आहे?
जगातील सर्वात तरुण अब्जाधीश हा किताब पटकावणारी लिव्हिया व्होइग्ट एका व्यावसायिक कुटुंबातील आहे. त्यांची कौटुंबिक कंपनी ही भारतातील मोटार उत्पादक कंपन्यांपैकी एक आहे. WEG नावाच्या या मोटार कंपनीत लिव्हिया वोग्टची सर्वात मोठी वैयक्तिक भागीदारी आहे. ही कंपनी Livia Voigt चे आजोबा वर्नर रिकार्डो व्होइग्ट यांनी सुरु केली होती. फोर्ब्सच्या मते, लिव्हिया व्होइटची एकूण संपत्ती सुमारे 1.1 अब्ज डाॅलर आहे.
भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश कोण ?
भारतातील सर्वात तरुण अब्जाधीशांच्या यादीत झिरोधाचे संस्थापक नितीन कामथ आणि निखिल कामथ यांची नावे आघाडीवर आहेत. याशिवाय आघाडीचे ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टचे सचिन आणि बिन्नी बन्सल यांनाही भारतातील सर्वात तरुण अब्जाधीशाचा किताब मिळाला आहे.
सावित्री जिंदाल या भारतातील सर्वात श्रीमंत महिला –
फोर्ब्सने जाहीर केलेल्या अब्जाधीशांच्या यादीत जवळपास 200 भारतीयांनी आपले स्थान निर्माण केले आहे. मुकेश अंबानी भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून उदयास आले आहेत, तर जिंदाल समूहाच्या अध्यक्षा सावित्री जिंदाल या भारतातील सर्वात श्रीमंत महिला बनल्या आहेत. त्यांची एकूण संपत्ती 35.5 अब्ज डॉलर्स आहे.