इंदापूर – त्यांची लेकरं आहेत आमची लेकरं नाहीत का ? आधी आमचं २७ टक्के आरक्षण भरा मग तुम्हाला काय करायचं ते करा असा थेट इशारा मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal ) यांनी सरकारला दिला. इंदापूर येथे पार पडलेल्या ओबीसी एल्गार मेळाव्यात ( Obc elgar melava ) भुजबळ बोलत होते. आमच्या आरक्षणाला धक्का लावू नका एवढीच आमची मागणी आहे असं भुजबळ यावेळी म्हणाले. ( Obc Reservation )
कुणबी प्रमाणपत्र द्या.. या मागणीमुळे महाराष्ट्रात मराठा समाज शिल्लक राहणार नाही कारण सर्वजण कुणबी होऊन जाणार. हा गरिबी हटाओचा कार्यक्रम नाही. यापूर्वी दलित समाजाला आरक्षण मिळालं परंतु आजही दलित समाज झोपडपट्ट्यांमध्ये राहतो. आरक्षण म्हणजे काय हे त्यांना (जरांगे) समजलेलं नाही असा टोला देखील भुजबळांनी यावेळी लगावला.
यावेळी भुजबळ यांनी जरांगे पाटील ( Jarange patil ) यांची हिंदी मीडियाला दिलेली प्रतिक्रिया ऐकवली.तसेच भुजबळांनी जरांगे यांच्यावर टीका करत त्यांची नक्कलच करून दाखवली. तसेच मी पहिल्यांदा महापौर आणि आमदार झालो होतो तू निदान ग्रामपंचायत सदस्य तरी होऊन दाखव असं थेट आव्हान भुजबळांनी जरांगे यांना दिल. ( Obc Certificate )
महाराष्ट्रातील विचार करणारा मराठा समाज ( Maratha Samaj ) देखील आहे पण तो आज गप्प का आहे ? मराठा समाजातील मोठे नेतेही आज गप्प आहेत.. कसली भीती वाटतीय ? मतांची ? मते त्यांच्याकडे आहेत मग आमच्याकडे नाहीत का ? त्यांच्याकडे २० % मते आहेत तर आमच्या ८० % आहेत असं देखील भुजबळ यावेळी म्हणाले. ( Obc resrvation )
मराठा नेत्यांना सवाल
सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीबाबत भुजबळ म्हणाले मला आता विचारायचं आहे, हर्षवर्धन पाटील कुणबी सर्टिफिकेट पाहिजे का ? आमचे जुने मित्र पुढे आहेत विजय सिंह मोहिते पाटील कुणबी सर्टिफिकेट घेणार का ? बोला.. काकडे कुणबी सर्टिफिकेट घेणार का ? बोला.. नको असेल तर नको म्हणून सांगा.. पण बोला गप्प का बसलात असं मराठा नेत्यांचं थेट नाव घेऊन भुजबळ यावेळी म्हणाले. ( harshwardhan patil vijaysaingh mohite patil )